
बेळगाव : इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये बेळगावच्या चिमुकलीने स्थान पटकावले आहे. विरभद्रनगर येथील रहिवासी शाबाज जमादार यांची दोन वर्षीय कन्या आयत जमादार या चिमुकलीने विविध प्रकारची फळे, फुले, वाहने, शरीराचे अवयव, इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्राणी, पक्षी, वैद्यकीय उपकरणे यांची ओळख पटवून देत आपली एक नवीन ओळख बनविली आहेत.
मोबाईलच्या जगात अवघ्या महिन्याच्या बाळापासून ते आबालवृद्ध सगळेच मोबाईलच्या आहारी गेले आहेत. मात्र वीरभद्र नगर येथील आयत याला अपवाद आहे. अवघ्या दोन वर्षे वयाच्या आयतला फळांपासून ते इलेक्ट्रॉनिक, वैद्यकीय उपकरणांची अचूक जाण आहे. यामागे तिच्या आई-वडीलांचे मार्गदर्शन आहे. जमादार दाम्पत्याने आयतला सुरवातीपासूनच मोबाईल पासून दूर ठेवले व पुस्तकांच्या माध्यमातून नवनवीन गोष्टी दाखविण्यावर भर दिला. तिची आई तिला रोज पुस्तकातील चित्रे दाखवून ओळख करून देते. त्यांच्या या प्रयत्नांना आज यश आले असून बेळगावच्या चिमुकलीचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाले असून याबद्दल आयत हिचे सर्व थरातून कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta