
बेळगाव : बेळगाव शहर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून सदाशिवनगर येथून चारचाकी कार चोरीला गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
सदाशिवनगर येथील रहिवासी प्रसाद पाटील यांची इको सेव्हन स्टार (क्रमांक केए 22 झेड 2374) ही चारचाकी बुधवारी पहाटे 3 ते 4.30 च्या सुमारास चोरीस गेल्याचे समजते. सदर चोरट्याची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात सदर घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास सुरु आहे.
Belgaum Varta Belgaum Varta