
दलित संघटनांचे आंदोलन: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
बेळगाव (वार्ता) : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना धमकीपत्र देणाऱ्या विरोधात कठोर शिक्षा व्हावी. शिवाय याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी विविध दलित संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दोन दिवसांपूर्वी अनोळखी व्यक्तींनी पत्र पाठवून जिल्हा पालकमंत्री सतीश जरकीहोळी यांना थेट धमकी दिली आहे. एवढी धमक येते कुठून असा प्रश्न उपस्थित करत अशा व्यक्तींविरोधात सखोल चौकशी लावत कडक कारवाई शासनाने करावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यंमार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून राणी चनम्मा चौकातून या आंदोलनाला सुरवात करण्यात आली. यावेळी “सतीशअण्णा जिंदा बाद”चा नारा देण्यात आला. कर्नाटक भीमरक्षण संघटनेचे संस्थापक तसेच राज्याध्यक्ष ईश्वर गुडज यांनी बोलताना बुद्ध -बसव विचारधारणेने चालणे चुकीचे आहे का? असा प्रश्न उपस्थित करत जिल्ह्यात 18 आमदार असून ते सतीशअण्णा यांच्याबाजूने आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.
कर्नाटक भीमरक्षण महिला संघटनेच्या राज्याध्यक्ष मंजुळा रामगानट्टी यांनी सांगितले की, बुद्ध – बसव आणि आंबेडकर यांच्या विचाराने सर्व समाजाला एकत्र घेऊन जाणारे नेते म्हणुन सतिश जारकीहोळी यांची ओळख आहे. अशा व्यक्तीविरोधात कोण तेढ माजवतय याची चौकशी झाली पाहिजे, काही समाजकंटकांना भीमाकोरेगाव सारख्या घटना घडवून आणायच्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला.
यावेळी दलित संघर्ष समिती आंबेडकर वाणी संघटनेचे राज्याध्यक्ष बसवराज दोडमनी यांनी आंबेडकर विचार कोणी कमी करण्याचा प्रयत्न करते काय? असे सांगत बहुजन समाजातील बांधवांनी याविरोधात एकीने लढा देण्यास पुढे आले पाहिजे.
यावेळी कऱ्याप्पा गुडनावर, उदय रेड्डी, दूर्गप्पा गाडीवड्डर, अपय्या मेस्त्री, परशुरामराम रामगानट्टी, कमलाप्पा करेनावर, पुजा बेविनकट्टी, प्रविण भोजगार, रमेश आलुर यांच्यासह विविध दलित संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta