Thursday , December 11 2025
Breaking News

येळ्ळूर ग्राम पंचायतीकडून केएसआरटीसीला निवेदन

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर गाव हे तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळखले जाते पण येळ्ळूरमध्ये ज्या बसेस चालू आहेत त्या वेळेवर येत नाहीत, गर्दीमुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये उभं राहायलाही जागा नसते. अशात काही विद्यार्थ्यांना तिही बस सोडावी लागते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन कॉलेज विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे.
येळ्ळूर गावाचा विस्तार मोठा असल्याने साहजिकच गावातून जवळजवळ 1000 शाळा कॉलेजचे विद्यार्थी रोज ये-जा करत असतात. तसेंच सकाळी 6:30, 7:00, 7:30, या वेळेत आरपीडी, गोगटे, आरएलएस, जी.एस.एस तसेच इतर शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी आहेत. तसेच 8:30, 9:00, 9:30, 10:00, 10:30 या वेळेत मराठा मंडळ, ज्योती कॉलेज, जैन कॉलेज, मजगाव आयटीआय कॉलेज आणि इतर शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि कामावर जाणाऱ्या लोकांसाठी या बसेस वेळेत असणे सोयीस्कर गरजेचे आहे.
त्यामुळे या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन येळ्ळूर ग्राम पंचायतीकडून केएसआरटीसी, डि सी श्री. गणेश राठोड यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, येळ्ळूर गावासाठी वेळेवर बसेस सोडाव्यात यावे व गावातील विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय दूर करावी.
निवेदन देतेवेळी ग्राम पंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्राम पंचायत सदस्य शिवाजी नांदूरकर, रमेश मेनसे उपस्थित होते. यावेळी या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढू असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

“मराठी” संदर्भात अल्पसंख्यांक आयुक्तांचे कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवाना पत्र

Spread the love  बेळगाव : बेळगावमधील मराठी भाषिकांच्या भाषिक अधिकारांचे संरक्षण करावे तसेच भाषिक अल्पसंख्यांक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *