
बेळगाव : सेवानिवृत्त शिक्षक श्री. वाय.पी. नाईक यांना बेळगाव जवळील बहाद्दरवाडी गावातील खेळाडूचा फोन आला. खेळात सहभागी होण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.

लागलीच श्री. वाय. पी. नाईक यांनी त्यांचे मित्र श्री. संतोष दरेकर यांना फोन केला आणि फेसबुक फ्रेंड सर्कलच्या संतोष यांनी रियाला मदत करण्यासाठी त्याच्या मित्रांना फोन करायला सुरुवात केली पण त्यांना लगेचच मदत मिळत नव्हती.. पण कुठेतरी आशा होती. कोणीतरी मदत करील म्हणून संतोष यांनी आपले प्रयत्न चालूच ठेवले आणि फ्रीमसन्स लॉज व्हिक्टोरिया क्रमांक 9 ने याची दखल घेत खेळाडूला मदत करण्यासाठी आपल्या मदतीचा हात पुढे केला व आवश्यक निधीची व्यवस्था केली. सकाळचे 11:30 वाजले होते आणि ट्रेन सुटायला शेवटचा 1 तास बाकी होता. खेळाडूला गावातून आणणे आणि तिकीट बुक करणे हे शिक्षक वाय. पी. नाईक आणि संतोष यांच्यासमोर आव्हानात्मक काम होते. संतोष यांनी आपल्या मित्राची गाडी मागवली आणि वाय. पी. नाईक यांनी खेळाडू आणि तिच्या पालकाना आणि प्रशिक्षकाला आणण्यासाठी कारमधून गेले. ते वेळेत रेल्वे स्टेशनवर पोहोचले. विद्यार्थ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि शिक्षकांबद्दलचे प्रेम होते. तिने सर्व फ्रीमेसन्स लॉज व्हिक्टोरिया क्रमांक 9 टीमचे मनापासून आभार मानले आणि श्री. विनायक लोकूर यांच्या पाठिंब्याशिवाय हे मिशन शक्य झाले नसते असे उदगार काढले.
यावेळी बोलताना वाय. पी. नाईक म्हणाले की, शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणाऱ्या विद्यार्थ्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो याचा आम्हाला आनंद वाटतो आणि खेळाडूंनी कधीही हार मानू नये यासाठीचा हा एक चांगला धडा आहे.
Belgaum Varta Belgaum Varta