Thursday , March 5 2026
Breaking News

क्षुल्लक वादातून गोजगा गावात तरूणाचा खून

Spread the love

 

बेळगाव : क्षुल्लक कारणामुळे झालेल्या वादातून धारदार विळ्याने सपासप वार करून खून केल्याची घटना गोजगा (तालुका बेळगाव) येथे शनिवारी (ता.14) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
राजू बंडू नाईक (वय 32) व मारूती नाईक (वय 32) या दोघामध्ये सतत वाद होत असत. आजही क्षुल्लक कारणावरून दोघांत वादाची ढिणगी पडली. वाद सुरू असतानाच राजू याने मारूती याच्या पोटावर धारदार विळ्याने वार केला. परिणामी मारूती यामध्ये गंभीर जखमी झाला. मारूती याला दुचाकीवरून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती मारूती नाईक यांच्या कुटुंबाकडून देण्यात आली.

वार पोटावर वर्मी लागल्यामुळे अतिरक्तस्त्रावर होऊन मारूती नाईक यांचा मृत्यू झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच गावातील तरूणांनी जिल्हा रूग्णालयाच्या समोर गर्दी केली होती. या खूनासंदर्भात पोलिसाकडून तापस सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे बेळगाव विमानतळावर स्वागत

Spread the love  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील तीर्थ क्षेत्र यडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *