
बेळगाव : मल्लापूर, घटप्रभा, गोकाक तालुक्यात हनीट्रॅपचा आरोप झाल्याने स्थानिक लोकांनी मध्यरात्री एका महिलेला हार घालून तिची धिंड काढल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा येथे घडली.
मल्लापूर येथील मृत्युंजय सर्कलमध्ये स्थानिक महिला आणि पुरुषांनी श्रीदेवी नावाच्या महिलेला चप्पल हार घालून मध्यरात्री रस्त्यावरून तिची धिंड काढली आणि काही महिलांनी तिला मारहाण केली.
सदर व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. महिला श्रीदेवीवर हनीट्रॅपचे आरोप झाले आहेत. ती तरुणांना हनीट्रॅप करून पैसे उकळत असे. या कारणावरून पी. जी. नगर येथील महिला व रहिवाशांनी तिच्या घरी जाऊन विचारपूस केली. यावेळी तिला अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ करून संतप्त महिलांनी तिला खेचून घराबाहेर काढले. महिला आणि काही पुरुषांनी तिला पुष्पहार घालून रस्त्यात तिची छेड काढली आणि नंतर पोलीस ठाण्यात आणून तिला ताब्यात दिले.
श्रीदेवी ही महिला सध्या पोलिस कोठडीत असल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी महिलेला अमानुष वागणूक देणाऱ्यांविरोधातही तक्रार दाखल केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta