
बेळगाव : टिळकवाडी -बेळगाव, येथील वीर सौध योगा केंद्रातर्फे एक दिवसाची सहल आयोजित करण्यात आली होती. बेळगाव ते नरसोबाची वाडी असा बसने प्रवास करण्यात आला. गुरुवार हा श्री दत्ताचा दिवस. हे औचित्य साधून आनंद घेतला. एस.टी. बस मोफत सेवेचा लाभ घेतला.
रोज योगा करत असल्याने शरीर तंदुरुस्त होते. महिला, पुरुष काही पंचाहत्तरी वयाचे होते. आहार, विहार महत्त्वाचा असतो. हे या उपक्रमांतून सिद्ध झाले. या वयांत मन आनंदी ठेवणं आवश्यक असते. बेळगाव ते चिकोडी, तेथून नरसोबाची वाडी, कृष्णा नदीच्या पात्रात स्नान करतानाचे मन प्रसन्न झाले.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा, महाप्रसाद घेऊन श्रद्धेने मनाला शांती समाधान लाभले. छान पैकी, तेथील प्रसिद्ध एकसंबा गावातील बासुंदीची, खरेदी करताना वय विसरून आनंद मिळवला.

यावेळी योगायोग म्हणजे साहित्यिक कवी अशोक नायगावकर हे देवदर्शनासाठी आले होते. तीही भेट महत्त्वाची ठरली.
या वयात ही सहलीचा आनंद घ्यावा हा एक आदर्श ठेवला आहे.
प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे यांनी योग्य असे नियोजन केले. या सहलीत वीस जणांचा समावेश होता.
Belgaum Varta Belgaum Varta