
बेळगाव : बेळगाव – दिल्ली विमानफेरीला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार विमानफेरीच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार आता हे विमान सकाळच्या सत्रात बेळगावमध्ये दाखल होणार आहे.
५ ऑक्टोबरपासून बेळगाव- दिल्ली विमानफेरीचा शुभारंभ झाला. या दोन्ही शहरांतर्गत प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे विमानफेरीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. केवळ
अडीच तासांमध्ये बेळगावहून दिल्लीला प्रवास करता येत असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दि. २९ ऑक्टोबरपासून विमानफेरीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येणार आहे. सकाळी ६.२० वाजता दिल्ली येथून निघालेले विमान सकाळी ८.५० वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात सकाळी ९.२० वाजता बेळगावमधून उड्डाण घेतलेले विमान सकाळी ११.५० वाजता दिल्ली येथे पोहोचेल. या नव्या वेळापत्रकानुसार यापुढील काळात विमानाची ये-जा होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta