Monday , December 8 2025
Breaking News

महानगरपालिकेची मराठी फलकावर पुन्हा वक्रदृष्टी

Spread the love

 

बेळगाव : धर्मवीर संभाजी महाराज चौकात महानगरपालिकेने अचानक पणे व्यावसायिक आस्थापनावरील मराठी फलक तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ गणेशोत्सव मंडळाचे फलक हटवण्याही मोहीम सुरु केली, सदर बातमी कळताच युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी धाव घेऊन महानगरपालिकेची मोहीम अडविली.
उपस्थित महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर मोहीम राबवून कायद्याचे उल्लंघन का करत विचारणा करीत अधिकाऱ्यांना घेराव घातला, २०१४ साली कर्नाटक उच्च न्यायालयाने व्होडाफोनने दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना कर्नाटक सरकारने फलकाचा ६०% भाग हा कानडी भाषेत असावा हा कायदा भारतीय राज्य घटनेचे कलम १३ व १९ चे उल्लंघन असल्याचे सांगत हा कायदा कर्नाटक उच्च न्यायालयाने बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला होता, अशी माहिती देत उच्च न्यायालयांच्या आदेशाची प्रत अधिकाऱ्यांना दाखविताच अधिकारी नरमले तसेच अल्पसंख्याक आयोगाने महानगरपालिकावर मराठी फलक लावण्याच्या संदर्भात अजून का कार्यवाही केली नाही, असे विचारणा करताच अधिकारी निरुत्तर झाले, आणि प्रकरण अंगाशी येत असल्याचे ओळखून मोहीम गुंडाळून काढता पाय घेतला. महानगरपालिकेने अशी मोहीम पुन्हा सुरु केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी नगरसेवक शिवाजी मंडोळकर, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, शुभम शेळके, आनंद चौगुले, प्रथमेश शिंदे, विशाल गवळी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

Spread the love  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *