
बेळगाव : शनी मंदिर परिसरात एका कुत्र्याला बिबट्याप्रमाणे रंगविण्याचा प्रकार घडला आहे. काही उपद्रवी लोकांनी स्वतःच्या मनोरंजनासाठी चक्क मुक्या प्राण्याला ऑईलपेंट लावून बिबट्या प्रमाणे रंगविले. रंग लावल्यामुळे सदर कुत्र्याच्या सर्वांगाला खाज सुटली आहे त्यामुळे ते आपले अंग खाजवत सर्वत्र फिरत होते. अंग खाजवल्यामुळे त्याच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या ही बातमी सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र अवधूत तुडवेकर यांना समजताच त्यांनी परिसरात जाऊन त्या कुत्र्याचा शोध घेतला आणि त्या कुत्र्याला अंघोळ घालून तो पेंट केलेला रंग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ऑईलपेंट असल्यामुळे तो रंग निघत नव्हता. त्यामुळे स्वतःच्या मनोरंजनासाठी मुक्या जनावरांच्या जीवाशी खेळ करू नये मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये असे आवाहन अवधूत तुडवेकर यांनी केले आहे. मुक्या जनावरांना त्रास देणाऱ्या उपद्रवी लोकांबद्दल नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta