
बेळगाव : बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी हे लाच घेण्याचा प्रयत्न करताना पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याची घटना घडली आहे.
बेळगावचे जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड हे लोकायुक्तांच्या जाळ्यात सापडले आहेत. कित्तूर तालुक्यातील तुरुमुरी बसवेश्वर शैक्षणिक संस्थेच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी सदर संस्थेकडे लाच मागितली. शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन कुरी यांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती.
आज लोकायुक्त पोलिसांनी 40 हजार रुपयांची लाच घेताना छापा टाकून बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांना अटक केली.
Belgaum Varta Belgaum Varta