
बेळगाव : मंगळवार दिनांक 24 रोजी विजयादशमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी बेळगाव शहर मंडळाच्या वतीने सायंकाळी साडे चार वाजता कॅम्प येथील मराठी विद्यानिकेतनच मैदानावर परंपरागत सिमोलंघनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला बेळगावच्या महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांना बेळगाव शहर देवस्थान मंडळाच्या वतीने आज शनिवारी सकाळी निमंत्रण देण्यात आले आहे.
शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक रणजीत चव्हाण पाटील तसेच विकास कलघटगी यांनी आज सकाळी महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौरांची भेट घेतली, आणि त्यांना सिमोलंघन कार्यक्रमासंदर्भात आमंत्रण दिले.

प्रत्येक वर्षी चव्हाट गल्ली येथील पंच मंडळाच्या वतीने श्री जोतिबा देवाच्या सासनकाठीचे पूजन करून मिरवणूक काढण्यात येते. हुतात्मा चौक येथे शहरातील विविध देवस्थानांच्या पालख्या एकत्र जमतात. तेथून सर्वजण वाजत गाजत सिमोलंघनासाठी मैदानावर पोहोचतात. कॅम्प येथील मराठी मराठी विद्यानिकेतन मैदानावर परंपरेनुसार सिमोलंघनचा कार्यक्रम पार पडतो. यावेळी शस्त्रपूजन आदी कार्यक्रम पार पडतात. या कार्यक्रमाला बेळगाव येथील सर्व मान्यवर जातीने उपस्थित असतात. या वर्षीच्या कार्यक्रमाला महापौर, उपमहापौर तसेच सर्व नगरसेवकांनी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन रणजीत चव्हाण पाटील यांनी यावेळी बोलताना केले
Belgaum Varta Belgaum Varta