Sunday , July 26 2026
Breaking News

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या

Spread the love

 

बेळगाव : काळादिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. रविवार दिनांक २२ रोजी दुपारी ठिक २.०० मराठा मंदिर (रेल्वेओव्हरब्रिज) येथे हि बैठक आयोजित करण्यात आली आहे.

१ नोव्हेंबर १९५६ रोजी सीमाभाग अन्यायाने त्यावेळच्या म्हैसूर व आताच्या कर्नाटक राज्यात डांबण्यात आला. या अन्यायाविरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती प्रतिवर्षी काळादिन पाळण्यात येतो. या काळादिना संदर्भात चर्चा करण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी,आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी कळविले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *