
बेळगाव : बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या विरोधात विविध दलित संघटनांनी महापालिकेसमोर आज निदर्शने केली.
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील दलितविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करून त्यांच्या विरोधात विविध दलित संघटनांनी आज बुधवारी पालिकेसमोर आंदोलन केले. आमदार अभय पाटील यांनी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांचा छळ केल्याचा तसेच, अशोक दुडगुंटी हे दलित अधिकारी असल्याने त्यांच्यावर खोटा आळ घेतल्याचा आरोप करण्यात आला.
यावेळी बोलताना दलित संघटनेचे नेते रवी म्हणाले की, दलित संघटनेचे कार्यकर्ते ढोल आणि नगाऱ्यासह आंदोलन करत आहेत. आ. अभय पाटील हे दलित अधिकाऱ्यांना त्रास देत असून महापालिकेच्या कामकाजात विनाकारण हस्तक्षेप करत आहेत. रमाकांत कोंडूसकर म्हणाले की, महापालिकेत अधिकारी चांगले काम करत आहेत, मात्र आमदार अभय पाटील त्यांच्या विरोधात कारस्थान करत आहेत.
यावेळी विविध दलित संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta