
येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी युवा संघटनेच्या वतीने आयोजित संगीत भजन स्पर्धेत श्रीहरी संगीत कला मंच कल्लेहोळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, तर मुक्त ग्रुप महिला भजनी मंडळ टिळकवाडी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला असून, रवळनाथ भजनी मंडळ गोल्याळी व विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ कुद्रेमनी, चौथा क्रमांक सुद्धा विभागून देण्यात आला असून, हनुमान भजनी मंडळ हब्बनहट्टी व थळेश्वर भजनी मंडळ हंदीगनूर, पाचवा क्रमांकही विभागून देण्यात आला असून, शिव गणेश भजनी मंडळ दारोळी व धन्य ते माता-पिता भजनी मंडळ बाकनुर यांना देण्यात आला आहे. संगीत भजन स्पर्धेत एकूण 28 भजनी मंडळांनी भाग घेतला होता. परीक्षक म्हणून मुख्याध्यापक महेश सडेकर व विजय बांदीवडेकर यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण समारंभ रविवार (ता. 29) रोजी सकाळी 9-30 वाजता परमेश्वर नगर येळ्ळूर येथील नेताजी मराठी सांस्कृतिक भवन या ठिकाणी होणार आहे. तेव्हा नंबर मिळालेल्या भजनी मंडळांनी वेळेत उपस्थित राहून आपले बक्षीस घेऊन जावे, असे आवाहन नेताजी युवा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. विजेत्यांना रोख रक्कमेसह स्मृतिचिन्हही देण्यात येणार आहे. तेव्हा विजेत्या संघानी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन नेताजी युवा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta