
बेळगाव : ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज रात्री 9 च्या सुमारास बेळगाव बस स्थानकाजवळील सर्किट हाऊस समोर घडली. मोहन भरमा पाटील (वय 55) रा. मंडोळी असे घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे.
बेळगाव उत्तर रहदारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रकने मोहन पाटील यांच्या स्प्लेंडर दुचाकीला दिलेल्या धडकेत तो जागीच ठार झाला. तो यापूर्वी कारखान्यात तर सध्या मेकॅनिक काम देखील करत होता कामानिमित्त सकाळी लवकरच घरातून बाहेर पडला होता रात्री घरी परतताना त्याच्या दुचाकीला अपघात झाला.
त्याच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. शुक्रवारी रात्री अपघात झाल्यावर रहदारी उत्तर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मयताचे शव जिल्हा रुग्णालयातील शवगारात ठेवण्यात आले असून शनिवारी सकाळी मंडोळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
एकूणच या अपघातानंतर पुन्हा एकदा अवजड वाहनांना शहरात प्रवेश बाबतचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरात अवजड वाहनांना प्रवेश रोखण्यासाठी किंवा रहदारी नियंत्रण करण्यासाठी उड्डाण पुलांची गरज व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta