Friday , March 6 2026
Breaking News

सकल मराठा समाजाची उद्या बैठक

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक २ रोजी सायंकाळी ठीक ५.०० वाजता जत्तीमठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीमध्ये सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात मराठायोद्धा मनोज जरांगे- पाटील यांनी आंदोलन हाती घेतले आहे. या आंदोलनासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या बैठकीला बेळगाव परिसरातील समस्त सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *