बेळगाव : नेहरूनगर येथील बसवणा मंदिर नजीक गेल्या काही दिवसांपासून गटारीचे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे . वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांना तसेच परिसरातील दुकानदारांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या समस्येकडे महापालिकेचे साफ दुर्लक्ष झाले असून जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नेहरू नगरातील या रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरु असते. या ठिकाणी गटारांचे बांधकाम तर करण्यात आले मात्र याप्रमाणे सीडी बांधकाम करण्यात आलेले नाही. सीडीची उंची कमी असल्याने लहान असल्याने सांडपाणी पुढे वाहून न जाता ते रस्त्यावर वाहत आहे याच सांडपाण्यातून वाहने तसेच पादचाऱ्यांना दुर्गंधी सहन करीत जावे लागत आहे. कित्येक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. महानगरपालिकेकडून गटारांची स्वच्छता करण्यात येते मात्र, त्यानंतर तीच परीस्थिती निर्माण होते. जोपर्यंत गटाराचे नवीन सीडीवर्क करण्यात येत नाही तोपर्यंत सांडपाणी रस्त्यावरच वाहत राहणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta