बेळगाव : महाद्वार रोड बेळगांव येथील यश हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भलिंग तपासणीचा प्रकार उधळून लावण्यात आला असून हॉस्पिटल मधील रुग्ण नोंदणी पुस्तक, गर्भवती महिलांचे स्कॅनिंग रिपोर्ट ताब्यात घेतले असून स्कॅनिंग रूमला टाळे ठोकण्यात आले आहेत. बेळगावच्या उपविभागीय अधिकारी आणि आरोग्य विभागाने संयुक्तिक छापा टाकून सदर गैरप्रकार उघडकीस आणला आहे. सदर प्रकरणी हॉस्पिटल आणि संबंधित डॉक्टरना नोटीस बजावण्यात अली आहे.
बेळगावचे उपविभागीय जिल्हाधिकारी, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यानी सदर कारवाई करून गर्भधारणा पूर्व व प्रसव तर लिंग निर्धारण कायद्याचे उल्लंघन करून तपासणी करणाऱ्या डॉक्टर एस. के. पाटील यांच्या यश हॉस्पिटलवर छापा टाकला. कारवाईदरम्यान हॉस्पिटलमध्ये स्त्रीभ्रूण आढळून आले असून हॉस्पिटलमधील अल्ट्रा साउंड मशीन जप्त करून स्कॅनिंग रूमला टाळे ठोकण्यात आले आहेत. रुग्णालयाला अवैधरित्या गर्भनिदान केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली असून आठवड्याभरात सदर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. बेळगाव एसी श्रवण कुमार, प्रोबेशनरी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला, जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. विश्वनाथ एमभोवी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. गर्भलिंग निदान चाचणी आणि स्त्री भ्रूण हत्या राजरोसपणे होत असल्याची माहिती मिळताच संबंधित खात्याने ही कारवाई केली आहे या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta