बद्रीनाथ- उत्तराखंड : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. तिथे आज सकाळी ते केदारनाथाच्या दर्शनाला पोहोचले. यावेळी त्यांच्यासमोर बेळगावमधल्या सीमाभागातील सीमावासीयांनी घोषणाबाजी केली. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा सीमावासीयांनी केली. तसंच उद्धवसाहेब, आदित्यसाहेब तुम्ही काहीच काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं म्हणत या सीमाभागातील रहिवाशांनी ठाकरेंना आपलं समर्थन दिलं. तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोषही यावेळी करण्यात आला.
बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, तसंच जायेंगे तो महाराष्ट्र में नहीं तो जेल में… अशा घोषणा या सीमाभागातील नागरिकांनी दिल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी हात जोडले. तसंच शिवरायांच्या नावाचा जयघोष करण्यात आला तेव्हा उद्धव ठाकरे यांनीही या भाविकांच्या सुरात सूर मिसळले.
Belgaum Varta Belgaum Varta