बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने आयोजित गंगावती येथे झालेल्या प्रांतस्तरीय आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धेत बेळगावचे प्रतिनिधित्व केलेल्या केएलएस शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रणीत भिंगुर्डे व कुबेर रेवणकर ( के.एल.एस. स्कूल) यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत बेळगांव शाखेला हा मान मिळवून दिला. त्यांची आता विशाखापट्टणम येथे 26 नोव्हेंबर रोजी होणार्या विभागीयस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यावेळी गंगावती येथे बेळगांव शाखाध्यक्ष विनायक घोडेकर व नंदा गर्लहोसूर उपस्थित होते.
बेळगांव शाखेच्यावतीने त्यांना विशेष गौरविण्यात येऊन पुढील उच्चस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भारत विकास परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta