बेळगाव : दिवाळी पाडव्याच्या निमित्त येळ्ळूर शिवाजी रोड श्री दुदाप्पा बागेवाडी यांच्या घरासमोर काढलेल्या रांगोळीतून सादर केली अखंड महाराष्ट्राची मागणी कधी होणार? बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह “अखंड महाराष्ट्र”. जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, या जयघोषातच प्रतिवर्षी बेळगांव येथे दिवाळी सणाला सळसळत्या उत्साहात आणि चैतन्यमयी वातावरणात सुरुवात होते. पण एक संदेश म्हणून महाराष्ट्र राज्याची प्रतिमा काढून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपले बलिदान दिलेल्या शूरवीरांच्या स्मृती महाराष्ट्रात व सिमाभागात जागवल्या जातात. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी शेकडो लोकांनी आपले प्राण वेचले. बेळगांव मधुन अनेक हूतात्म्य झाले. महाराष्ट्र सर्वच बाबतीत देशभरात आघाडीवर आहे. पण बेळगांवसह सिमाभागावर महाराष्ट्र व केंद्र सरकारचा अन्याय झाला. व महाराष्ट्र अपुरा राहिला आहे. प्रत्येक सीमावासियांच्या मनातील हा प्रश्न कधी सोडवला जाईल असा संदेश रांगोळीतून देण्यात आला.