बेळगाव : यरमाळ रोड, वडगाव, येथील एक महिला आपल्या मुलीसह गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. यासंबंधी तिच्या पतीने शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस त्या मायलेकीचा शोध घेत आहेत.
वैशाली सचिन किचाडे (वय 36), मुलगी सिद्धी (वय 12) दोघेही राहणार यरमाळ रोड, वडगाव, अशी त्यांची नावे आहेत. गेल्या मंगळवार 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 ते सायंकाळी. 5.30 या वेळेत हे मायलेक बेपत्ता झाले आहेत. या मायलेकरांविषयी कोणाला माहिती असल्यास 0831-2405244 या क्रमांकावर शहापूर पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta