Monday , December 23 2024
Breaking News

येळ्ळूर येथे बी. एल. कानशिडे यांना श्रद्धांजली

Spread the love

 

येळ्ळूर : समाज शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. बी. एल. कानशिडे यांचे (वय ८२) नुकतेच निधन झाले. त्याबद्दल समाज शिक्षण संस्था व महाराष्ट्र हायस्कूलतर्फे शोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

शोकसभेच्या अध्यक्षस्थानी समाज शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा लिला मेणसे होत्या. कै. बी. एल. कानशिडे यांच्या कार्याचा आढावा घेणारी भाषणे मुख्याध्यापक बी. पी. कानशिडे व शिक्षक अनिल हुंदरे यांनी केली. समाज शिक्षण संस्थेतर्फे लिला मेणसे व संचालक रवींद्र गिंडे यांनी तर महाराष्ट्र हायस्कूलतर्फे मुख्याध्यापक कानशिडे यांनी आदरांजली वाहिली.

शोकसभेला संस्थेचे सचिव जीवकुमार घाडी, संचालक गोविंद हलगेकर, पुंडलिक मेणसे, आनंद पाटील आदींसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर सामान्य ज्ञान स्पर्धेत घवघवीत यश

Spread the love  बेळगाव : 865 सीमावासीय प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य मंच बेळगाव यांच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *