बेळगाव : शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षा पलटी झाल्याने तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मच्छे येथे घडली आहे. बेळगाव खानापूर रोडवर दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पिरनवाडी येथील इंग्लिश मिडीयम शाळेतून मच्छेकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला अपघात झाला आहे. मच्छे येथे खानापूर रोडवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला वाचवण्यासाठी रिक्षाने ब्रेक लावला त्यात रिक्षा पलटी झाल्याने संतप्त नागरिकांनी दुचाकी फोडल्याची घटना घडली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta