Tuesday , September 17 2024
Breaking News

महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार; नियोजनासाठी 11 सदस्यांची नियुक्ती

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ 4 डिसेंबर रोजी मराठी भाषिकांचा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
महामेळाव्यासंदर्भात आज बुधवारी दुपारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक मराठा मंदिर येथे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
मराठी भाषिकांचा हा मेळावा यशस्वी करण्यासाठी तसेच मेळाव्यासंदर्भात पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 11 सदस्यांची नियोजन कमिटी नेमण्यात आली. सदर समितीमध्ये कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, ऍड. एम. जी. पाटील, ऍड. राजाभाऊ पाटील, बेळगाव शहर समितीतून खजिनदार प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, बी. ओ. येतोजी, रणजीत चव्हाण- पाटील तर खानापूर तालुक्यातून गोपाळराव देसाई, मुरलीधर पाटील, गोपाळ पाटील, निरंजन सरदेसाई नियुक्ती करण्यात आलेली आहे. या समितीचे सदस्य मेळाव्या यशस्वी करण्यासंदर्भात रूपरेषा ठरवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.
यावेळी बोलताना मनोहर किणेकर म्हणाले की, कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सीमावासीयांच्या विरोधात आहे. मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठीच कर्नाटक सरकार हे अधिवेशन बेळगाव सुवर्णसौंधमध्ये घेत आहे. कर्नाटक सरकार आमचे घटनात्मक हक्क डावलून कन्नड सक्ती करत आहे. मराठी भाषा संपविण्याचा प्रयत्न करत आहे. यालाच आम्ही या महामेळाव्यातून विरोध दर्शविण्याचे काम करत आहोत. असे सांगून यावर्षीचा महामेळावा यशस्वी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कुचराई केली जाणार नाही, असे स्पष्ट केले.
विशेष करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना याबाबत अवगत करावं अशी आग्रहाची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. तिचा निश्चितपणे विचार केला जाईल आणि मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून किंवा त्यांना प्रत्यक्ष भेटून माहिती देण्यात येईल, असे शेवटी स्पष्ट केले.
बैठकीस मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *