Thursday , March 5 2026
Breaking News

कणकुंबी येथे 25 लाखाची अवैध दारू जप्त

Spread the love

 

बेळगाव : कणकुंबी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथील चेक पोस्टवर गोव्याहून दारूची बेकायदा वाहतूक करणारी लॉरी अडवून अबकारी अधिकाऱ्यांनी लाॅरीतील सुमारे 25 लाख रुपये किमतीच्या अवैध दारूसह एकूण 40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाई संदर्भात वरिष्ठ अबकारी अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले की, मिळालेल्या विश्वासनीय माहितीच्या आधारे आमचे पोलीस निरीक्षक बाळनगौडा पाटील यांनी कणकुंबी चेक पोस्टच्या ठिकाणी गोव्याकडून येणारी ही लॉरी अडवली. त्यानंतर लॉरीची झडती घेतली असता तिच्यामध्ये ब्लेंडर्स स्प्राईड दारूसह बनावट दारूचा मोठा अवैध साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या या दारू साठ्याची बाजारातील किंमत सुमारे 25 लाख इतकी होते.

या पद्धतीने लॉरीची किंमत 15 लाख पकडता एकूण 40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी लॉरीचा चालक सुबोध मेहता (रा. बिहार) याला अटक करण्यात आली आहे.

जप्त करण्यात आलेल्या लॉरीचे रजिस्ट्रेशन महाराष्ट्रात झालेले आहे. त्यामुळे गोव्याहून बेकायदा दारूची वाहतूक करण्याचे हे कृत्य आंतरराज्य तस्करांचे असून दारू नेमकी कोठे नेण्यात येत होती हे अधिक तपासांती स्पष्ट होणार आहे असे सांगून रॉयल स्टॅग सारख्या उंची दारूच्या रिकामा बाटल्यांमध्ये कशाप्रकारे बनावट दारू भरून त्याची बेमालूम विक्री केली जाते याची माहितीही अधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली. तसेच शरीराला घातक अशा या बनावट दारूपासून लोकांनी सावध राहावे. उंची दारू जर कोणी स्वस्तात कमी दरात विकत असेल तर ती खरेदी करू नये.

सरकारच्या मान्यताप्राप्त दारू दुकानांमध्येच लोकांनी दारू खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. अलीकडच्या काळात आम्ही चार-पाच वेळा अशा प्रकारच्या मोठ्या अवैध दारू साठ्यासह मुद्देमाल जप्त केला आहे. ज्याची एकूण किंमत जवळपास 3 कोटी रुपयांपर्यंत होते. या जप्त केलेल्या दारूमध्ये रॉयल स्टॅग, ब्लेंडर स्प्राईड, सिग्नेचर, ब्लॅक डॉग, हंड्रेड पेपर आदी सारख्या उंची महागड्या दारूचा समावेश आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *