बेळगाव : बेळगावातील खडेबाजार पोलिसांना तीन आंतरराज्य मोटरसायकल चोरांना जेरबंद करण्यात यश आले आहे.
मोटारसायकल चोरीस गेल्याप्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात पोलिसांनी तीन आंतरराज्य चोरांना अटक केली.
महेश निंगाप्पा (23), अमीर बाबू इळगी (19) आणि प्रशांत गोपाळ मोरे (21) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी बेळगाव, अथणी, विजयपूर, महाराष्ट्र आणि गोवा येथे दुचाकी चोरत होते.
आरोपींकडून एक टीव्हीएस अपाची, दोन बजाज पल्सर एनएस, 5 हिरो स्प्लेंडर प्लस, 2 होंडा शाइन, 1 बजाज प्लॅटिना, 1 हिरो स्प्लेंडर प्रो अशा एकूण 6,79,000 किमतीच्या 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
खडेबाजार पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक करत बेळगाव शहर पोलिस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta