बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी शाळेच्या क्रीडांगणावरील जिमखाना हॉलचे चौकट पूजन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य श्री. संतोष रमेश मंडलिक हे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळचे सचिव प्राध्यापक विक्रम पाटील, संचालक श्री. पी. पी. बेळगावकर, सह्याद्री सोसायटीचे मॅनेजर श्री. अनिल कणबरकर, यश ऑटो गॅरेजचे मालक शिवसंत श्री. संजय मोरे, रुक्मिणी इंटरप्राईज टाइल्सचे मालक श्री. संजय जाधव, सीनियर सिटीजन क्लब बेळगावचे सदस्य श्री. रमेश पवार, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष श्री. डी. बी. पाटील हे उपस्थित होते. तसेच शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. नारायण पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवन व स्वागत गीताने झाली. मुख्याध्यापक श्री. पी. आर. पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून जिमखाना हॉल बांधण्याचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले फोटोचे पूजन श्री. संजय मोरे व श्री. संजय जाधव यांनी केले. दीप प्रज्वलन सचिव प्रा. विक्रम पाटील, श्री. पी. पी. बेळगावकर, श्री. अनिल कणबरकर, श्री. रमेश पवार, श्री. डी. बी. पाटील, श्री. नारायण पाटील आदी मंडळींनी केले. यानंतर संस्थेचे सचिव प्रा. विक्रम पाटील यांनी आपल्या भाषणात बौद्धिक खेळ व मैदानी खेळ यांचे महत्व सांगून जिमखाना हॉलमधील खेळ व मैदानावरील खेळ या संधीचा लाभ घेऊन खेळामध्ये व अभ्यासामध्ये यशस्वी व्हा, असे विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
श्री. पी. पी. बेळगावकर यांनी खेळाबद्दल व अभ्यासाबद्दल मार्गदर्शन करून हायस्कूलच्या प्रगतीचा आढावा घेतला.यानंतर प्रमुख पाहुण्यानी सुद्धां विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. यानंतर. श्री. डी. बी. पाटील यांनी आरोग्य चांगले राहण्यासाठी अनेक प्रकारचे खेळ खेळले पाहिजेत असे सांगून खेळाविषयी व आरोग्य विषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व या उपक्रमासाठी सर्वांनी आर्थिक मदतीचा हातभार लावावा असे आव्हान केले.
यानंतर जिमखाना हॉलचे चौकट पूजन प्रमुख पाहुणे व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शेवटी अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एल. पी. झंगरूचे व श्री. जी. आय. गुंजटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती रेखा पाटील यांनी केले. श्री. भाऊ काटकर यांनी देणगीचा आढावा घेतला. याप्रसंगी खालील देणगीदारानी देणग्या दिल्या. मारुती लक्ष्मण पाटील रू. 11000, श्री. रमेश पवार रू. 5000, श्री संजय मोरे रू. 2500, श्री. अनिल कणबरकर रू. 2500, श्री. महेश नारायण पाटील रू. 5000, श्री. एम. वाय. घाडी रू. 2500, श्री. संजय जाधव यांनी जिमखाना हॉलमध्ये फरशी व इतर मान्यवरांनी देणगी देण्याचे जाहीर केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक शाळा सुधारणा कमिटी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.