बेळगाव : कर्नाटक राज्य सार्वजनिक शिक्षण खाते बेंगलोर यांच्या विद्यमानाने कर्नाटक राज्यस्तरीय प्राथमिक आंतरशालेय मुलींच्या विभागीय फुटबॉल स्पर्धेत बेळगाव विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सेंट झेवियर्स हायस्कूलच्या प्राथमिक मुलींच्या संघाने अतुलनीय कामगिरी करताना स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविले. बेंगलोर येथील झालेल्या स्पर्धेत सलामीच्या सामन्यात बेळगाव विभागीय संघाला चुरशीच्या लढतीत म्हैसूर विभागीय संघाकडून चुरशीच्या लढतीत 0-1 असा पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या सामन्यात बेळगाव विभागीय संघाने बेंगलोर विभागीय संघाचा 1-0 असा रोमहर्षक लढतीत विजय संपादन केला. हा एकमेव विजयी गोल श्रावणी सुतार हिने नोंदविला. तिसऱ्या सामन्यात बेळगाव विभागीय संघाने कलबुर्गी विभागीय संघाचा 6-0 असा दणदणीत पराभव करत स्पर्धेत दुसरे स्थान पटकाविले. यावेळी श्रावणी सुतार 3, इपाह अत्तार 2, इंद्रायणी पावनोजी 1 गोल नोंदविला.
बेळगाव विभागीय सेंट झेवियर हायस्कूलच्या संघात प्रांजल हजेरी, श्रावणी सुतार, श्रद्धा पाटील, मयुरी तिम्मापूर, जान्हवी चव्हाण, इपाह बडेभाई, तेजल हन्सी, निधी नागोजीचे, मारिया मुजावर, गौरी कलगौडर यांचा संघात समावेश होता.
वरील खेळाडूंना ज्येष्ठ फुटबॉल प्रशिक्षक रवीशंकर मालशेट, मानस नायक, क्रीडाशिक्षक ज्युलेट फर्नांडिस यांचे मार्गदर्शन तर शाळेचे प्राचार्य सिरीयल ब्रिगॅस, शिक्षक व पालक वर्गाचे प्रोत्साहन लाभत आहे.