
बेळगाव (प्रतिनिधी) : टिळकवाडी येथील पहिले रेल्वे गेट परिसर हा मृत्यूचा सापळा बनला आहे. रेल्वे येऊन गेल्यानंतर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या ठिकाणी समस्या निर्माण होत आहेत. असाच प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. या प्रकारामध्ये एका सायकलस्वाराचा बळी गेला आहे. रेल्वे गेट ओलांडून निघालेला सायकलस्वार ट्रक खाली सापडून ठार झाल्याची दुर्दैवी घटना सातच्या सुमारास घडली. या घटनेमुळे टिळकवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच टिळकवाडीतील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांची मागणी होत आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नाही. रहदारी पोलिस पुढील तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta