बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीची जी भावना तिचं महाराष्ट्राची भावना आहे, असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. सध्या नवी दिल्ली मुक्कामी असणार्या समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाने आज सकाळी महाराष्ट्रातील खासदार अमोल कोल्हे यांची देखील भेट घेतली.
या भेटीप्रसंगी त्यांनी खासदार कोल्हे यांना दीपक दळवी यांच्यावर झालेला हल्ला, बेळगाव येथून स्थलांतरित करण्यात आलेले भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय, मराठी भाषिकांवर होणारा अन्याय आदिंबाबतची माहिती दिली.
अल्पसंख्याक कार्यालय स्थलांतराचा फटका चार राज्यांना बसत आहे. बेळगावच्या मराठी माणसांवर अल्पसंख्याकाचे अधिकार डावलने हा अन्यायचं असेही खासदार कोल्हे यांनी यावेळी नमूद केलं. भाषिक अल्पसंख्यांक कार्यालयाच्या बाबतीत ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच लोकसभेमध्ये एकंदर प्रश्न मांडण्यासाठी प्रयत्न करू असेही सांगितले.
याप्रसंगी म. ए. समिती युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, बेळगाव बिलोंग्ज टू महाराष्ट्र संघटनेचे पियुष हावळ आदी उपस्थित होते.
या सर्वांनी भेटीप्रसंगी बेळगावचे प्रा. आनंद मेणसे लिखित ‘संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ हे सीमाप्रश्नाची समग्र माहिती असणारे पुस्तक खासदार धैर्यशील माने आणि खासदार अमोल कोल्हे यांना सप्रेम भेटीदाखल दिले.
Check Also
कर्नाटक कोचिंग सेंटरमधून 50 हून अधिक विद्यार्थ्यांची एसएससी जीडी 2024 परीक्षेमध्ये निवड
Spread the love बेळगाव : विनय ल्हासे सर आणि श्रीशैल तल्लुर सरांच्या मार्गदर्शनाखाली एकाच कोचिंग …