गोकाक : गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील नऊ महिन्यांच्या बाळासह सात जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील अक्कतंगेरहाळ गावात हा प्रकार घडला असून रात्री जेवण करून सर्वजण झोपी गेल्याने स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा गॅस सिलेंडर अचानकपणे वास येत असल्याचे लक्षात येताच घरच्यांनी उठून मोबाईल टॉर्च ओपन केला. त्या टॉर्चच्या प्रकाश झोतात गॅस सिलेंडरने स्फोट घेतल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये नऊ महिन्याच्या बाळासह सात जण जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी बेळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य जखमींवर गोकाक येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. रात्रीच्या वेळी गॅसचा वास आल्याने मोबाईल टॉर्च ऑन केल्यावर स्फोट घडला असल्याची माहिती मिळाली आहे स्फोटाची तीव्रता इतकी होती की, त्यामुळे घराची कौले उडून दूरवर पडली. स्फोटामुळे घरातील साहित्याचे देखील नुकसान झाले आहे. अंकलगी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta