Thursday , March 5 2026
Breaking News

वंटमुरी प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Spread the love

 

बेळगाव : न्यु वंटमुरी गावात महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याच्या घटनेची दखल केंद्रीय स्तरावर घेण्यात आली असून आता कर्नाटक सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली असून कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे. चार आठवड्यात या नोटीसला उत्तर देण्याची सूचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि मागासवर्गीय कल्याण आयोगाच्या सदस्यांनी न्यु वंटमुरी गावाला भेट देऊन तसेच पीडित महिलेची जिल्हा रुग्णालयात भेट घेऊन माहिती घेतली. भाजपच्या सत्यशोधक समितीच्या चार महिला खासदारांनी देखील पीडित महिलेची भेट घेऊन कर्नाटकातील काँग्रेस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याची टीका केली आहे.
पीडित महिलेला पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली असून दोन एकर जमीन देखील मंजूर करण्यात आली आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास एसीपी एस. व्ही. गिरीश यांच्याकडे सोपवण्यात आले असून कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी काकती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजय सिन्नुर यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी आजवर एकूण अकरा जणांना अटक करण्यात आली असून आणखी एका संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
सीआयडीचे डीआयजी सोमवारी बेळगावला येणार असून तपास अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेऊन पुढील तपास सुरू करणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *