प्रथमेश परमकर प्रथम; दोन हजार जणांचा सहभाग
निपाणी (वार्ता) : येथील म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर ‘नेसा’ आयोजित गोल्ड प्लस निपाणी- रासाई हिल मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्या. पुरुष, महिला आणि लहान, मोठ्या गटासाठी झालेल्या स्पर्धेत चीन जर्मनी येथील धावपटूंचा सहभाग होता. या स्पर्धेत २ हजार जणांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेत २५ कि.मी.मध्ये पुरुषांच्या १८ ते ३० वयोगटातून प्रथमेश परमकर याने १ तास ३४ मिनिटे ९ सेकंदात अंतर पार करून ‘गोल्ड प्लस’ मॅरेथॉनच्या चषकावर आपले नाव कोरले.
महिला गटातून २५ कि. मी. मध्ये १८ ते ३० वयोगटातून भक्ती पोटे हिने २ तास २९ मिनिटे ५२ सेकंदात अंतर पार करून चषक पटकावले.
खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले व मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना रोख बक्षीस, चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी २५, १० आणि ५ कि.मी. अशा अंतराच्या स्पर्धा घेण्यात आल्या. पुरुषांच्या २५ कि.मी. अंतराच्या १८ ते ३० वयोगटातून आदिनाथ देवूडकर याने १ तास ३४ मिनिटे ४९ सेकंदात अंतर कापून द्वितीय क्रमांक पटकावला. तर सौरभ पाटील याने १ तास ३५ मिनिटे ४१ सेकंदात अंतर कापत तृतीय क्रमांक मिळवला.
१८ ते ३० वयोगटात महिला विभागातून स्वरुप पुजारी, श्वेता पाटील, विश्वांती सुतार यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. २५ कि. मी. ३० ते ४५ वयोगटात पुरुष गटातून परशराम कोणगी, राहुल शिरसाट, राज अलदी, महिला गटातून शुभांगी पाटील, जिया शेख,कविता जाधव यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. २५ कि. मी. ४५ वर्षापेक्षा अधिक वयोगटातून शिवलिंगप्पा गुट्टगी, श्रेणिक पाटील, कट्टप्पा तिरुई, महिला गटातून अनिता पाटील यांनी बक्षीसे पटकावली.१० कि.मी. १८ वर्षाखालील पुरुष गटातून प्रथमेश पाटील, संदीप लोहार, दर्शन जाधव, महिला गटातून ईशा शिंदे, आरिया दोशी, तनिष्का मेदार यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले.
१८ ते ३० वयोगट पुरुष विभागातून दाजी हुब्बार, शिवराज घोलरके, मोमु सिंग, महिला विभागातून निकीता मरटे, शुभांगी सावंत, दीपाश्री पेजरे, अश्विनी हंद्राळ यांनी यश मिळवले. ३० ते ४५ वयोगटात पुरुष विभागातून बाबु चौगला, जगदीश शिंदे, झुंजार माने, महिला विभागातून रविना गिरी, भाविका मुथा, निलांबरी जगताप यांनी अनुक्रमे क्रमांक
पटकावले. ५ कि. मी. अंतराच्या मॅरथॉनमध्ये स्पर्धकांनी मोठा सहभाग नोंदवला होता. मॅरेथॉनमध्ये धारवाडच्या ९ वर्षीय विवेक हंद्राळ याने १० कि. मी. अंतर पार करण्यात यश -मिळविले.
टीम नेसाचे अध्यक्ष डॉ. संदीप चिखले यांनी स्वागत तर उपाध्यक्ष डॉ. सुहास पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी गोल्ड प्लसचे सीईओ जिम त्यागी, मुख्य व्यवस्थापक वरूण त्यागी, टीम नेसाचे सेक्रेटरी अतिश खोत, दीपक मेंडगुदले, सचिन कुलकर्णी, साहिल शाह, संजय गोडबोले, तुषार माळी, जयदीप गुरव, डॉ. प्रमोद निळेकर, राजेश घाटे, योगेश पुराणिक, विनोद साबळे, डॉ. अर्जुन जनवाडे, अमर संकपाळ, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. हर्षल जाधव, डॉ. मिलिंद कमते, मंजुनाथ पिसोत्रे, वैभव वरुटे, मंगेश नायर, सुधीर भोजने, डॉ. देव टिंगरे, अश्विन पाटील, वैभव पाटील आदी उपस्थित होते. खजिनदार डॉ. माधव कुलकर्णी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta