बेळगाव : कॅम्प येथील दोन असह्य वृद्ध महिलांना एंजल फाउंडेशनच्या वतीने मदत देण्यात आली आहे. कॅम्प येथे एका त्या घरामध्ये दोन महिला रहात होत्या तसेच त्यांची परिस्थिती देखील बिकट बनली होती. ही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या महिलांशी बोलून अडचणी समजून घेतल्या आणि एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांना फोन करून याबद्दल सविस्तर माहिती दिली.
यावेळी मीनाताई बेनके यांनी सविस्तर माहिती घेऊन ताबडतोब त्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्या महिलांना मदत देऊ केली. त्यावेळी अवधूत तुडयेकर, आतिश धातोंबे, सिद्धार्थ शिर्के, स्वयंम पाटील यांच्यासह पोलीस टीम उपस्थित होती.
Belgaum Varta Belgaum Varta