
बेळगाव अबकारी विभागाची कारवाई
बेळगाव : बेळगाव उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेळगावातील काकतीनजीक मोठ्या प्रमाणात बेकायदा दारूसाठा जप्त केला. बेळगावमार्गे मध्यप्रदेशकडे या दारूची वाहतूक सुरू होती. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
गोव्यातून २० ते ३० टन दारू नजीकच्या आंध्रप्रदेश व तामिळनाडू राज्यातील ट्रकमधून परराज्यात नेण्यात येत होती. रात्रीच्या वेळी एका गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी थांबविण्यात आला होता. बेळगाव मार्गे मशरूमच्या पोत्यांमधून तस्करी होत असलेली बेकायदा दारू उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना उत्पादन शुल्क आयुक्त वाय. मंजुनाथ म्हणाले, आज गोव्यातून परराज्यात बेकायदा दारू वाहतूक करणारा ट्रक पकडून, दारू वाहतुकीचा मोठा प्रयत्न आम्ही हाणून पडला आहे. या अवैध दारू वाहतुकीत अनेकांचा सहभाग आहे. त्यांना पकडण्यासाठी आम्ही ठिकठिकाणी सापळे रचले आहेत. दारू आणि वाहन मिळून ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ६०० बॉक्समध्ये भरून बेकायदा दारू वाहतूक होत असल्याच्या प्राप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगाव उत्पादन शुल्क विभागाने या वर्षभरात बेकायदा दारू वाहतुकी विरोधात केलेल्या कारवाईपैकी ही आणखी एक मोठी कारवाई आहे.
Belgaum Varta Belgaum Varta