Friday , March 6 2026
Breaking News

कॅपिटल वनतर्फे एस.एस.एल.सी. व्याख्यानमालेचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : अनसुरकर गल्ली बेळगाव येथील ‘कॅपिटल वन’ या संस्थेच्यावतीने शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत एस.एस.एल.सीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. संस्था सातात्याने 14 व्या वर्षी या व्याख्यानमालेचे आयोजन करीत आहे.

बेळगांव परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या समृध्द, आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या म्हणजेच काठावर पास होणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी परीक्षेची तयारी कशी करावी, अशा दोन स्वतंत्र विभागात या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. व्याख्यानमालेच्या अनुषंगाने अभ्यासक्रमातील अडचणींवर योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला उत्तम आकार देण्याकरीता कॅपिटल वनने उचललेले हे पाऊल आहे.

सदर व्याख्यानमालेची सुरुवात 31 डिसेंबर 2023 ते 11 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ज्योती महाविद्यालय कॅम्प बेळगांव येथे दर रविवारी सकाळी 8.15 ते 12.00 या वेळेत भरविण्यात येणार आहे. व्याख्यानमालेच्या उदघाटनाचा कार्यक्रम रविवार दि. 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 8.00 वाजता ज्योती महाविद्यालयातील सभागृहात संचालक मंडळ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, असे संस्थेचे चेअरमन श्री. शिवाजीराव हंडे यांनी कळविले आहे.

संस्थेकडे शाळा मुख्याध्यापकांनी केलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या नोंदणीप्रमाणे बहुसंख्य विद्यार्थी या व्याख्यानमालेचा लाभ घेणार असून सर्व विद्यार्थी वर्गानी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *