Monday , September 21 2026
Breaking News

खादरवाडी येथील दहा जणांना जामीन

Spread the love

 

मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

बेळगाव : खादरवाडी येथील जमिनीच्या वादातून दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील चौघांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्या चौघांना जामीन मंजूर करण्यात आला तर आणखी सहा जणांना अटकपूर्व जामीन न्यायालयाने दिला आहे.
खादरवाडी येथील जनतेवर नाहक गुन्हे दाखल करण्यात आले. रमेश बाबुराव माळवी, प्रल्हाद कृष्णा कमती, राजू ऊर्फ राजेश यल्लाप्पा पाटील, परशराम कृष्णा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. तर काही दिवसांनंतर पुन्हा राकेश यल्लाप्पा पाटील, बाबुराव टोपाण्णा
पाटील, जोतिबा बाळू मिसाळे, पिराजी गुंडू पिंगट, विनायक चांगदेव पाटील, शाम भुजंग पाटील सर्व राहणार खादरवाडी या सर्वावर भादंवि १४३, १४७, १४८, ३०७, ५०४, ५०६, ३२३, ३२४ सहकलम १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या सर्वांनी मुख्य जिल्हा सत्र
न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्या अर्जावर सुनावणी होऊन १ लाख रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र, तितक्याच रकमेचा एक जामीनदार, पोलिसांना सहकार्य करणे, प्रत्येक तारखेला हजर राहणे या अटींवर जामीन देण्यात आला आहे. या सर्वाच्यावतीने ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. हेमराज बेंचण्णावर, ऍड. शंकर बाळनाईक यांनी काम पाहिले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *