बेळगाव : कन्नड संघटना आणि कर्नाटक प्रशासनाने चालविलेल्या कन्नड फलक बळजबरी, मराठी फलकांच्या अवमानाविरुद्ध व दोन भाषिकामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सोमवार दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता मा. पोलीस आयुक्त बेळगाव व महानगर पालिका आयुक्त, बेळगाव यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी युवा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, मराठी भाषिकांनी, व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.