बेळगाव : येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल शाळाला किर्तीकुमार श्रीराम माने यांनी आज सावित्रीबाई फुले जयंती दिनी आपल्या स्वर्गवासी मातोश्री कै. सुधा श्रीराम माने यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शाळेच्या स्लॅबवरील शेडसाठी विद्युत रोषणाईचे साहित्य देणगी दाखल दिले.
सदर कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने झाली. प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्याची ओळख शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शोभा निलजकर यांनी करून दिली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी प्रमुख पाहुण्याचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनतर पाहुण्यांसह विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
याप्रसंगी शाळेच्या एसडीएमसी अध्यक्षा रुपा श्रीधर धामणेकर, उपाध्यक्ष श्री.जोतिबा यल्लाप्पा उडकेकर, सदस्य मारुती कृष्णा यळगुकर, मुर्तीकुमार श्रीराम माने, जोतिबा शांताराम पाटील, अलका सुनील कुंडेकर, राजश्री बसवराज सुतार, दिव्या संदिप कुंडेकर, प्रियांका राणोजी सांबरेकर, रेश्मा पुंडलिक काकतकर, गायत्री यल्लाप्पा बिर्जे, सरकारी दवाखानाच्या कर्मचारी आशाबाई, आदींसह सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शाळेचे विद्यार्थी -विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.