
बेळगाव : मतिमंद मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बेळगावातील बेळवट्टी गावात ही घटना घडली असून बापाने केलेल्या या कृत्यामुळे सदर मुलगी गरोदर झाली आणि तीने एका मुलाला जन्म दिला आहे.
आई गमावलेल्या मानसिक आजारी मुलीवर बापाकडून घरात सतत अत्याचार होत होता. सदर मतिमंद तरुणी गरोदर राहिल्यानंतर स्थानिकांना संशय आला. आशा वर्कर्सना माहिती देऊन तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समजले.
एका स्वयंसेवी संस्थेने फेब्रुवारी २०२३ मध्ये बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. त्या आधारे बापावर संशय आला आणि त्यांची व जन्मलेल्या बाळाची डीएनए चाचणी केल्यानंतर तोच मुलाचा बाप असल्याची खात्री पटली.
यावर प्रतिक्रिया देताना बेळगावचे पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा म्हणाले की, मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार एनजीओने केली होती. या प्रकरणाची चौकशी केली असता तिच्या वडिलांनी हे कृत्य केल्याचे उघड झाले. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta