Thursday , March 5 2026
Breaking News

काँग्रेस रोडवर भरधाव मोटरसायकलची कारला धडक

Spread the love

 

बेळगाव : बेळगावातील काँग्रेस रोडवर गुडनेस हेल्थ हब फार्मासमोर झालेल्या भीषण अपघातात बाईकस्वार युवक गंभीर जखमी झाला. बेळगावातील काँग्रेस रोडवर गुडनेस हेल्थ हब फार्मासमोर आज, शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. भरधाव मोटरसायकल क्रेटा कारला धडकून ही दुर्घटना घडली. धडकेनंतर मोटरसायकल चालक युवक रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडला. तर त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. रुग्णाला वेणुग्राम रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून वेणुग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यांनी टिळकवाडी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. या प्रकरणी वाहतूक दक्षिण पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *