गोकाक : गोकाकजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील लोळसुरजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. हा अपघात लोळसुर पूल ते नाका क्रमांक 1 दरम्यान झाला आहे. भरधाव ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने ट्रॅक्टर पलटी झाली व त्या ट्रॅक्टरखाली दोन दुचाकीस्वार अडकल्याचे समजते. दुचाकीस्वार हे गोकाककडे जात होते तर उसाने भरलेला ट्रॅक्टर गोकाक येथून लोळसुरकडे जात होता. मृतांपैकी एक जण मुडलगी तालुक्यातील शिवापूर येथील रहिवाशी असून दुसरा राजापूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. दुधाप्पा हडगिनाळ (45) व सुट्टप्पा अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मुडलगी तालुक्यातील शिवापुर गावातील रामप्पा चिंचली (वय 50) याच्यावर या प्रकरणी गोकाक पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta