बेळगाव : येळ्ळूर येथील ‘प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटी’ने आर्थिक क्षेत्रात केलेले कार्य कौतुकास्पद आहे. सोसायटीने सहकाराच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी कार्य करत राहिले पाहिजेत, असे प्रतिपादन महापौर शोभा सोमनाचे यांनी सोसायटीच्या शाखा स्थलांतर कार्यक्रमात केले. अध्यक्षस्थानी चेअरपर्सन माधुरी पाटील या होत्या.
नगरसेविका सारीका पाटील यांनी, सोसायटीचे कार्य पाहून मी भारावून गेले आहे. येळ्ळूरच्या महिला प्रत्येक लढ्यात अग्रेसर असतात. त्यांच्या कार्याला मी सलाम करते, असे विचार व्यक्त केले.
याप्रसंगी नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर यांनी, महिलांनी विविध महिला गृहउद्योगात झेप घेऊन उपेक्षित महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रारंभी महापौर शोभा सोमनाचे यांच्या हस्ते वडगाव शाखेचे उद्घाटन करण्यात आले. स्वराज्य संस्थापक छ. शिवाय महाराजांचे पूजन नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर यांनी केले. कॅशकेबिनचे उद्घाटन नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर आणि न्यू नवहिंद मल्टिपर्पजचे चेअरमन नारायण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले तर श्रीलक्ष्मी पूजन चेअरपर्सन माधुरी पाटील यांनी केले. सेफलाॅकरचे उद्घाटन नम्रता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शाखेसाठी जागा दिल्याबद्दल महापौरांच्या हस्ते सौ. शांता मारूती जुवेकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता उदय जाधव यांनी केले तर आभार शामल यशवंत जाधव यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास सोसायटीच्या व्हा. चेअरपर्सन सुरेखा सायनेकर, सुनिता कणबरकर, वैशाली मजुकर, रेखा ह. पाटील, राजश्री दणकारे, रेखा य. पाटील, कीर्ती ठोंबरे, सल्लागार सी. बी. पाटील, नारायण बस्तवाडकर, पूजा कंग्राळक, स्वाती पाटील, प्रगती पाटील, अनिता जाधव, हिरा कुंडेकर, शीतल बस्तवाडकर, नयन उघाडे, संध्या हुंदरे, सुलभा पाटील, शारदा मुरकुटे, वर्षा अष्टेकर, उज्वला माणकोजी, नवहिंद को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे संचालक मंडळ, न्यू नवहिंद मल्टिपर्पज सोसायटीचे संचालक मंडळ, नवहिंद क्रीडा केंद्राचे कार्यकर्ते, नवहिंद महिला प्रबोधन केंद्राच्या कार्यकर्त्या आणि वडगाव परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.