
बेळगाव : विद्यार्थ्यांत जर आजच्या घडीला शिक्षकांची भीती आणि आदरयुक्त धाक असेल तर प्रत्येक विद्यार्थी आपल्या जीवनात आणि आवडीच्या क्षेत्रात तो नक्की यश संपादन करेल, असे उद्गार खानापूरचे लोकप्रिय आमदार श्रीमान विठ्ठलराव हलगेकर यांनी व्यक्त केले. तसेच दुसरे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले बेळगाव जिल्हा ग्रामीण भाजपचे जनरल सेक्रेटरी श्रीमान धनंजय जाधव हे होते. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले की, आजच्या घडीला भारत देशाला ऑलम्पिक, एशियन व इतर स्पर्धेमध्ये चांगले दिवस आले आहेत. भारत देश हा विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची लय लुट करत असल्याबद्दल त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे सांगितले.
शहापूर येथील पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय नूतन वाचनालयाचे उद्घाटन व श्री. पुंडलिकराव कंग्राळकर वाचनालय असे नामकरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन असा त्रिभुज संगमाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विठ्ठलराव हलगेकर तसेच धनंजय जाधव व अध्यक्ष म्हणून विश्व भारत सेवा समितीचे सचिव प्रकाश नंदीहळी हे उपस्थित होते.
आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा त्यांचे गुरुतुल्य शिक्षक वर्ग यांच्या हस्ते व महाविद्यालयाच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात श्री. पुंडलिकराव कंग्राळकर वाचनालयाचे उद्घाटन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन व ध्वजारोहण धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीताने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. कॉलेजमधील ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरीय क्रमांक मिळवले त्या विद्यार्थ्यांच्याद्वारे प्रज्वलीत मशाल पाहुण्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी प्रसाद सावंत यांच्याद्वारे शरीरसौष्ठचे प्रदर्शन व सुशांत टक्केकर याच्याद्वारे कराटेचे प्रदर्शन करण्यात आले. नंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती ममता पवार यांनी सर्व पाहुण्यांची ओळख करून दिली. व आलेल्या सर्व पाहुण्यांचे श्रीमान प्रकाशराव नंदीहळी यांनी सर्वांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर आमदार विठ्ठलराव हलगेकर, धनंजय जाधव तसेच जयवंत शहापूरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी वाचनालयासाठी एक लाख रुपयाची पुस्तके देण्याचे घोषित केले.
या कार्यक्रमाला विश्वभारत सेवा समितीचे संचालिका श्रीमती विमल कंग्राळकर, उपाध्यक्ष नेताजी कटांबळे, संचालक गजानन घोगरेटकर, एस. एम. साखळकर, पी. आर. गोरल, वाय. एन. कुकडोळकर, बि. डी. एकनेकर, प्रा. अनिल खांडेकर, प्रा. आमित खांडेकर, एल. ओ. चौगुले, एल. एन. पाटील, आर. डी. शिंदोळकर, एल. जी. कोलेकर व काॅलेजचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थिती होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्मिता मुतगेकर आणि प्रा. मयूर नागेनहट्टी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. के. एल. शिंदे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta