Thursday , March 5 2026
Breaking News

प्रजापिता ब्रह्माकुमारीतर्फे सरकारी पॉलिटेक्निकमध्ये कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वैद्यकीय विभाग व सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘माझा भारत व्यसनमुक्त भारत’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना भगिनी अश्विनी म्हणाल्या, व्यसनाधीनतेचे प्रमुख कारण हे मन आहे. मन एखाद्या वस्तूकडे आकर्षिले जाते त्यावेळी माणूस अभिरुचीचा दास बनतो. मित्रांच्या संगतीचा प्रभाव बुद्धीवर होतो. त्यासाठी स्वतःमध्ये परिवर्तन घडविले तरच जीवनात परिवर्तन घडविणे शक्य आहे.

डॉक्टर संगीता बेळगावीमठ यांनी कार्यक्रमात एड्स विषयक जागृती केली. यावेळी सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य वासुदेव आप्पाजीगोळ, महेश डोळ्ळीन, बीके मनोहर, महेश तुबाकी, शिवलिंग मुखन्नावर, सुचिता तळवार, संजीव कलाल, भगिनी संपत्ती, भगिनी मोहिनी आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात भाग घेऊन तो यशस्वी केला. भगिनी साधना यांनी ईश्वरीय विश्वविद्यालयाचा परिचय करून दिला. बी. के. मलेश यांनी व्यसनमुक्तीचे गीत सादर केले. राजकुमार पाटील यांनी स्वागत केले. बी के श्रीकांत यांनी सूत्रसंचालन केले. किरण कुमार यांनी आभार प्रदर्शन केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *