
बेळगाव : राज्य सरकारच्या कन्नड नामफलक अनिवार्य केल्याच्या आदेशानंतर बेळगाव महानगरपालिकेने कन्नड नामफलक न लावलेल्या दुकानदारांना नोटीस पाठविण्यास सुरवात केली आहे.बेळगाव महापालिकेच्या अखत्यारीतील दुकाने, व्यापारी आस्थापने, संकुलांची दररोज तपासणी करत संबंधित दुकानांच्या नामफलकांवर 60 टक्के जागा चिन्हांकित करण्यात येत आहे. नामफलकांवर 60 टक्के कन्नड मजकूर असणे अनिवार्य असल्याच्या नोटिसा 2050 दुकानांना बजावल्या आहेत.
दररोज आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे यांच्या नेतृत्वाखालील एक पथक शहरातील विविध भागात दुकानांना भेट देऊन नामफलकांवरील कन्नडच्या अंमलबजावणीचे निरीक्षण करत आहे. त्यांना दुकानांच्या पाट्यांवर 60 टक्के कन्नड भाषा वापरण्याच्या सूचना देणाऱ्या नोटिसा देऊन इशारा देण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत शासनाच्या आदेशाचे पालन केल्यास व्यापार परवाना रद्द करून दुकान सील केले जाईल, असे पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta