
बेळगाव : अयोध्येतील राममंदिराच्या लोकार्पणानंतर बेळगावात घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांच्या जमावावर बेळगावातील पाटील गल्ली येथे दुसऱ्या गटाकडून दगडफेक करण्यात आली.
राममंदिराच्या उद्घाटनानंतर तरुणांचा एक गट जय श्रीरामचा जयघोष करत बाहेर पडला. यावेळी तरुणांच्या या टोळक्यावर दुसऱ्या गटाकडून दगडफेक करण्यात आली. त्यांनीही प्रत्युत्तरात दगडफेक केली. एकमेकांवर दगडफेक झाल्याने दोन्ही गटात तणाव निर्माण झाला होता. तत्काळ घटनास्थळी नेमलेल्या पोलिसांनी हलका लाठीचार्ज केला.
Belgaum Varta Belgaum Varta